कोल्हापूर

नृसिंहवाडी सरपंच पार्वती कुंभार अपात्र

CD

नृसिंहवाडी सरपंच पार्वती कुंभार अपात्र
नृसिंहवाडी, ता. 2 ः येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पार्वती दत्तात्रय कुंभार यांच्या जातीच्या दाखल्याबाबत ओबीसी जातपडताळणी समिती कोल्हापूरने दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. यामुळे कुंभार यांचे सरपंचपद अपात्र ठरले आहे.
प्रतिवादी रमेश सुतार व चेतन गवळी यांनी सरपंच कुंभार यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात जातपडताळणी समिती कोल्हापूरकडे तक्रार दाखल केली होती. समितीने कागदपत्रांची छाननी करून सरपंच कुंभार या मूळ कर्नाटकातील असून, त्यांचा ओबीसी जातीचा दाखला अवैध ठरवला होता. या विरोधात सरपंचांनी वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जातपडताळणी समितीच्या निकालाला आव्हान देत याचिका सादर केली होती. वर्षभर सुरू असणाऱ्या या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांकडून बाजू मांडण्यात आल्या. आज झालेल्या अंतरिम निकालामध्ये न्यायमूर्ती एम. एम. साठे व आर. डी. धनुका यांनी सरपंच कुंभार यांची जातपडताळणी समितीच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे व जातपडताळणी समिती कोल्हापूरचा निकाल कायम ठेवला आहे. यामुळे सरपंच कुंभार अपात्र झाल्या.
दरम्यान, उच्च न्यायालयात याचिकेचे प्रतिवादी जातपडताळणी समिती कोल्हापूरमार्फत ॲड. कविता साळुंखे यांनी काम पाहिले. तसेच अन्य प्रतिवादी सुतार व गवळी यांच्यासाठी उच्च न्यायालयातील ॲड. विजय पाटील उंडाळकर व योगेश पाटील यांनी केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT