कोल्हापूर

श्रावणषष्ठी यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेला महत्त्व .. आढावा बैठक

CD

श्रावणषष्ठी यात्रेत भाविकांच्या सुरक्षितेला महत्व

प्रांताधिकारी शिंगटे ःजोतिबा डोंगर येथे यात्रेसंदर्भात आढावा बैठक

जोतिबा डोंगर, ता. ४ः ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्रावण षष्ठी यात्रेत भाविकांच्या सुरक्षितेला महत्व द्या. एकमेकांच्या सहकार्या‍ने ही यात्रा पार पाडू या,’ असे आवाहन पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले.
जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने यंदाच्या श्रावण षष्ठी यात्रेसंदर्भात आढावा बैठक आज झाली. यावेळी प्रांताधिकारी शिंगटे बोलत होते. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक जयकुमार सुर्यवंशी,तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सरपंच राधा बुणे आदी प्रमुख उपस्थित होते.
जोतिबाची श्रावणषष्ठी यात्रा येत्या २२ ऑगस्टला आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतून तीन लाखांहून अधिक भाविक येतात. यावर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने बैठकीत यात्रा काळातील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. या यात्रेत प्रामुख्याने साथीच्या रोगांवर आळा घालाण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. पाणी व स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.
यात्रेच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी शिंगटे यांनी दिल्या.तहसीलदार शिंदे यांनी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन केले. गटविकास अधिकारी माडकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध पाणी, गावातून पावडर फवारणी करून सर्व यंत्रणा सज्ज ठेवू, असे सांगितले. बैठकीमध्ये डोंगरावरील रस्त्यांची स्थिती, अतिक्रमणे, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, आरोग्यसेवा, स्वच्छता, वीज-पाणीपुरवठा , मंदिरातील दर्शन रांग, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव धैयशील तिवले, सुयश पाटील, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड , फौजदार मनोज कदम, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर, सुनिल नवाळे, आनंदा लादे, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT