कोल्हापूर

जोतिबा नवरात्र उत्सव आज पासून रोषणाईने उजळून निघाले मंदिर

CD

02609
जोतिबा मंदिर रोषणाईने उजळले
आजपासून नवरात्रोत्सव ः प्रशासन यंत्रणेसह सज्ज

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, ता. १४ ः येथील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात रविवार (ता. १५) पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मंदिरात विद्युतरोषणाई केल्यामुळे जोतिबा मंदिर व परिसर उजळून निघाला आहे. डोळे दीपवणाऱ्या रोषणाईमुळे मंदिराला वेगळीच शोभा आली आहे.
रविवारी सकाळी मुख्य मंदिरात सनई, तुतारी, ढोल वाद्यांच्या गजरात घटस्थापनेचा विधी होईल. त्यानंतर यमाई, तुकाई, भावकाई मंदिरांत पारंपरिक पद्धतीने घटस्थापनाचा विधी होईल. रविवार असल्यामुळे पहिल्याच दिवसापासून डोंगरावर गर्दी होईल. यासाठी कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी यंत्रणा सज्ज ठेवली असून देवस्थान समितीनेही जादा गार्ड मागविले आहेत. देवस्थान समितीने दर्शन मंडपातून दर्शन रागांचे नियोजनही केले आहे. ग्रामपंचायतीने पिण्याची पाण्याची सोय, स्वच्छताही केली आहे. डोंगरावरील नवरात्र उत्सव सोहळ्यास पारंपरिक महत्त्व असून हा सण पुजारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. शनिवारी (ता. २१) जोतिबा देवाचा जागर सोहळा होणार असून या दिवशी मंदिर रात्रभर खुले राहील. नऊ दिवस डोंगरावर गर्दी होईल; त्या दृष्टीने नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT