कोल्हापूर

जोतिबा देवस्थानच्या जमिनीमध्ये सुरू असणारे सपाटीकरणाचे काम पोहाळे ग्रामस्थांनी बंद पाडले

CD

03214
पोहाळे तर्फ आळते : येथील घोटीचा माळ लेण्याच्या खड्या परिसरातील सपाटीकरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले.

सपाटीकरणाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद
जोतिबा देवस्थान राखीव जमीन प्रकरण; जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला अहवाल

सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. १० : पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील जोतिबा देवस्थानच्या घोटीचा माळ, लेण्याच्या खड्या या ठिकाणी असणाऱ्या जमिनीत सपाटीकरण करण्याचे काम खासगी ठेकेदाराने सुरू केले होते. ते आज ग्रामस्थांनी बंद पाडले. यावेळी देवस्थान समितीचे कर्मचारी, पोलिस उपस्थित होते. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ठेकेदाराने काम बंद ठेवले.
दरम्यान, ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन हा भाडे करार रद्द करावा यासाठी भेटून चर्चा केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवून घेतला आहे. तो आल्यावर करार रद्द करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली आहे.
गट नंबर ११२२ मधील उंट घोड्यासाठी राखीव असणारी सुमारे दिडशे एकर जमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एका खासगी ठेकेदाराला नऊ वर्षे अकरा महिने या भाडे कराराने दिली आहे. या ठेकेदाराने तीन-चार दिवसांपासून जमिनीचे सपाटीकरण सुरू केले होते. या सपाटीकरणामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच प्राचीन लेण्यांना धोका निर्माण होणार आहे. म्हणून त्यांनी हे काम बंद पाडले आहे.
ग्रामस्थ व बौद्ध संघटनांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राचीन लेण्यांना धोका असल्याने हे काम बंद पाडावे यासाठीचे निवेदन दिले. वन विभागालाही याबाबत निवेदन दिले. दरम्यान, आज मंडल अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सायंकाळी भाडे करार रद्द करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT