०३३४८
जोतिबा डोंगर : रविवारी कंटनेर अडकल्याने वाहतूक ठप्प झाली. (निवास मोटे : सकाळ छायाचित्रसेवा )
जोतिबा डोंगरावर घाटात
कंटनेर अडकून वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. १५ : येथील कोल्हापूर-जोतिबा मार्गावरील शेवताई परिसरातील घाट रस्त्यात आज दुपारी वळण घेताना कंटनेर अडकला. परिणामी, सहा तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. क्रेन आणून कंटनेर बाजूला केल्यानंतर रात्री आठ वाजता वाहतूक सुरळीत झाली.
आज रत्नागिरीहून मिरजेकडे निघालेला कंटनेर वाट चुकून चालकाने या जोतिबा डोंगर घाटात आणला. नागमोडी वळणावर कंटनेर रस्त्याच्या मधोमध अडकला. त्यामुळे वाहतूक जाग्यावरच ठप्प झाली. दुचाकी वाहनामुळे तर रस्त्यात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ क्रेन आणण्यासाठी प्रयत्न केले. पण, आज रविवार सुटी असल्याने पोलिसांना रात्री आठच्या सुमारास क्रेन मिळाली. त्यानंतर कंटनेर बाजूला केला. त्यानंतर भाविक डोंगरावर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.