3360, 03361
...
3360
जोतिबा डोंगर : येथे मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त सोमवारी स्वच्छता करण्यात आली. (निवास मोटे : सकाळ छायाचित्रसेवा)
जोतिबा डोंगरावर
मंदिराची स्वच्छता
नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी
जोतिबा डोंगर, ता. ३० ः श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता करण्यात आली. सकाळी आठला स्वच्छतेस प्रारंभ झाला. जोतिबा मंदिर, नंदी महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाईदेवी या मंदिरांची स्वच्छता झाली. सर्व मंदिरांतील साहित्यही स्वच्छ करण्यात आले.
मंदिरातील नारळाच्या शेंडी, प्लास्टिक कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने मंदिरा बाहेर नेला. स्वच्छता मोहिमेसाठी देवस्थानचे माजी कर्मचारी ग्रामस्थ, पुजारी, भाविक, देवसेवक, देवस्थान अधीक्षक धैर्यशील तिवले, दहा गावकर व देवस्थानचे कर्मचारी, बीव्हीजी ग्रुप पुणे यांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पाणी प्रेशर मशिनच्या सहाय्याने स्वच्छता सुरू आहे. दरम्यान, नवरात्र उत्सवाची तयारी जोतिबा डोंगरावर सुरू असून घरोघरी रंगरंगोटी तसेच स्वच्छतेची कामे सुरू आहेत. येत्या गुरुवारपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास एक पारंपरिक महत्त्व असून नऊ दिवस जोतिबा देवासह इतर देवतांच्या सोहनकमळ पुष्पातील महापूजा बांधल्या जातात. देवाचे उंट घोडे विश्रांतीसाठी पावसाळ्यात तीन महिने पोहाळे तर्फ आळतेमध्ये होते. त्यांचे आगमन दोन दिवसांपूर्वी जोतिबा डोंगरावर झाले. त्यांचे डोंगरावर सुहासिनी महिलांनी पंचारतीने ओवाळून स्वागत केले. जोतिबा देवाचा जागर सोहळा १० ऑक्टोबरला होणार आहे. नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करणार असल्याचे अधीक्षक धैर्यशील तिवले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.