03632
केखले (ता. पन्हाळा) : येथील गणेशबाग ते मूळमाया यमाई मंदिर या पायरी मार्गाची झालेली दुरवस्था.
मालिका लीड
दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावर येण्यासाठी डोंगरा भोवतीच्या गावातून पायवाट व दगडी पायरी टप्पे हे पारंपरिक मार्ग पूर्वीपासून आहेत. या मार्गावरून दर रविवारी, पोर्णिमा, चैत्रयात्रा, षष्ठीयात्रा या काळात ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं''चा जयघोष करीत भाविक मोठ्या संख्येने डोंगरावर येतात. या मार्गांची दुरवस्था होत आहे. काही मार्ग तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या मार्गांची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या पारंपरिक मार्गाची आढावा घेणारी मालिका आजपासून
जोतिबा डोंगराच्या पायथ्याचे
पारंपरिक मार्ग : भाग-१
मानाच्या सासनकाठीचा मार्ग बनला धोकादयक
केखले गणेशबाग ते यमाई मंदिर दरम्यानचे चित्र; डागडुजीसह रात्री हवी विजेची व्यवस्था
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. १२ : केखले (ता. पन्हाळा) गावच्या गणेशबाग ते जोतिबा डोंगरावरील यमाई मंदिरापर्यंत अडीच किलोमीटर अंतरावर पूर्णपणे पायरी टप्पा व दगडी फरशांचा मार्ग आहे. सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. चैत्रयात्रा काळात भाविकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.
पाडळी (जि. सातारा), किवळ (ता. कराड) या मानाच्या सासनकाठ्या केखलेत मुक्काम करून या पायरी मार्गाने डोंगरावर चैत्रयात्रेत येतात. या सासनकाठीसोबत संपूर्ण गाव असते. इतर वेळी रविवार, पौर्णिमा, खेटे, यात्रा, षष्ठीयात्रा, नगर प्रदक्षिणा या दिवशी सातारा ते कराड या भागातील भाविक पायी याच रस्त्याने जातात. गणेश बागेमुळे या रस्त्याला मोठे महत्त्व आहे. दर संकष्टीला जोतिबासह केखले, पोखले, जाखले, माले परिसरातील लोक या मार्गाने गणेशबागेतील गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तेथे धार्मिक कार्यक्रम होतात. सध्या मार्गावर काही ठिकाणी पायऱ्यांचे टप्पे खराब झाले आहेत. वाटेतच पायऱ्या दगडी गुंडी तयार झाल्या आहेत. काही पायऱ्या बुजल्या आहेत. पावसाळ्यात मार्ग निसरडा होतो. चिखलामुळे भाविक पाय घसरून पडतात. त्यामुळे या धोकादायक पायऱ्यांची डागडुजी करून सासनकाठी आगमनाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
चौकट
बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर
या मार्गावर रात्री बिबट्या, गवे, तरस, कोल्हा या वन्यप्राण्यांच्या वावर असतो. येथे सौर वीज उभारणी केली तर हा परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघेल. भाविकांना रात्री उशिरा येण्याचीही व्यवस्था होईल. प्रशासनाने या रस्त्याकडे विशेष लक्ष घालून रस्ते दुरुस्तीसह इतर सुविधा करणे आवश्यक आहे.
---------
चौकट
गणेशबागेचे पारंपरिक महत्त्व
जोतिबा देवाचा सरसेनापती तोरण भैरव हा रत्नासूर राक्षसास मिळाल्यानंतर भैरव सैन्यासमोर सेनापती कोणास करावे, असा प्रश्न पडला. त्यावेळी महालक्ष्मी देवी व जोतिबा देवाने श्री गणेशाची निवड केली. त्यावेळी या गणेशाने जोतिबा डोंगराभोवती २१ ठिकाणी सूक्ष्म रूपाने वास्तव्य केले. त्यातील प्रमुख ठिकाण म्हणजे गणेशबाग होय. हे ठिकाण जोतिबा डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
कोट
केखलेतील गणेशबागेतील गणपती डोंगराभोवती असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. गणपती दर्शनाबरोबर या रस्त्यावरून जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविक पायी जातात. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. पायरी टप्प्याच्या बाजूला सेवा रस्ता करणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांचा वावर असल्याने विजेचे दिवे उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे चैत्रयात्रेत भाविकांना फायदाच होईल.
- हंबीरराव रंगराव चौगले, सरपंच, केखले (ता. पन्हाळा)
PHJ25B03632, PHJ25B03633
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.