कोल्हापूर

क्लस्टर स्कूलला आमदार आसगावकरांसह शिक्षक समितीचा विरोध

CD

01711
क्लस्टर स्कूलला शिक्षक समितीचा विरोध

फुलेवाडी, ता. १० : क्लस्टर स्कूल सुरू झाल्यास बहुजन समाजातील मुलं शिक्षण प्रवाहातून बाजूला जातील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत क्लस्टर स्कूल सुरू होता कामा नये. त्याला आमचा विरोध राहील, असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिला.
प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांची भेट घेतली. शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यान आमदार आसगावकर यांनी क्लस्टर स्कूलला तीव्र विरोध केला. श्री. चव्‍हाण म्हणाले, ‘लवकरच मुख्याध्यापक प्रमोशन होईल. ज्यांना यापूर्वी शाळा दिली आहे त्यांनाही याच आठवड्यात प्रमोशन आदेश देऊ. जे बारावी सायन्स आहेत, पण सध्या समाजशास्त्र किंवा मराठी विषय शिक्षक आहेत जर त्यांनी बीएससी पूर्ण केली असेल तर आयुक्तांकडून परवानगी घेऊन त्यांना विज्ञान विषय शिक्षक म्हणून नवीन आदेश देऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले. पगार खाती बदलण्यासाठी तीन महिने अगोदर अर्ज करावा, अशी सूचना शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केली. यावेळी समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, कृष्णात कारंडे, शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, बाजीराव पाटील, सतीश बर्गे, गणपतराव मांडवकर, सुनील कुंभार, बालाजी पांढरे, विनायक मगदूम, दीपक पाटील, युवराज सातोसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT