Satej Patil Principal Union Election
Satej Patil Principal Union Election esakal
कोल्हापूर

Satej Patil : दादा लाड गटास 12, बाबा पाटील गटाला 11 जागा; बिनविरोधसाठी सतेज पाटलांचा नवा फॉर्म्‍युला

सकाळ डिजिटल टीम

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पडळ हायस्कूल, पडळचे राहुल पवार, तर सचिवपदी आदर्श प्रशाला कोल्हापूरचे आर. वाय. पाटील यांची नावे निश्चित होण्‍याची शक्यता आहे.

फुलेवाडी : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची निवडणूक (Principal Union Election) बिनविरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दोन्ही गटांना फॉर्म्‍युला ठरवून दिला आहे. दादा लाड गटाला बारा जागा, तर बाबा पाटील गटाला अकरा जागा देण्याचे ठरले आहे. मुख्याध्यापक संघाच्‍या २३ जागांसाठी १३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चार दिवसांपासून सतेज पाटील यांनी दोन्ही गटांच्या अनेक वेळा बैठका घेत शेवटी समझोता घडवून आणला. त्यानुसार लाड यांच्या गटास अध्यक्ष, सचिव व खजानिस ही तीन पदे व नऊ संचालक अशा १२ जागा तर बाबा पाटील गटाला (Baba Patil Group) दोन उपाध्यक्ष व सहसचिव ही तीन पदे व आठ संचालक अशा ११ जागा देऊन तोडगा काढला आहे.

दुपारी समझोत्याचा निर्णय झाल्यानंतर कोणत्या तालुक्यात कोणाला संचालक पद द्यायचे हे कमी वेळात ठरवणे शक्य नसल्याने दोन्ही गटांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. ३० व ३१ मार्चला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. आमदार जयंत आसगावकर यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका कायम ठेवली. सत्ताधारी गटाच्या वतीने मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, बाबा पाटील, मिलिंद पांगिरेकर, तर विरोधी आघाडीकडून दादा लाड, दीपक पाटील, मनोहर पाटील, आदी चर्चेत सहभागी झाले होते.

दाखल झालेले उमेदवारी अर्ज

अध्यक्षपदासाठी ६, दोन उपाध्यक्षपदासाठी १५, सचिव ११, सहसचिव १२, खजानिस १२ व १७ संचालक पदांसाठी ८०, अशा २३ जागांसाठी १३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

राहुल पवार, पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पडळ हायस्कूल, पडळचे राहुल पवार, तर सचिवपदी आदर्श प्रशाला कोल्हापूरचे आर. वाय. पाटील यांची नावे निश्चित होण्‍याची शक्यता आहे. अध्यक्ष पदासाठी डी. एस. घुगरे यांचे नाव आघाडीवर होते; परंतु स्वतःहून ते नकार देत आहेत. घुगरे यांनी अध्यक्षपद स्वीकारले तर पवार यांना सचिवपदाची संधी मिळेल. अध्यक्ष व सचिव ही दोन्ही महत्त्वाची पदे लाड यांनी आपल्या गटाकडे घेतली आहेत. विद्यमान अध्यक्ष, सचिव रिंगणाबाहेर राहतील, अशी शक्यता दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT