कोल्हापूर

रंकाळ्यावरील अपुरी विकास कामे

CD

02201, 02202, 02203

रंकाळा सुशोभीकरण रेंगाळलेलेच
गर्दी कामांची, गती कासवाची; सहा सहा महिने प्रलंबित; संरक्षक भिंत, पदपथ, विद्युतीकरण अपुरे

राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा

फुलेवाडी, ता. १६ ः ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसराचा विकास विविध योजनांमधून केला जात आहे. मात्र विकासकामे प्रत्यक्ष गतीने होत नाहीत. ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था रंकाळ्यावरील विविध कामांची झाली आहे. काही कामे सहा-सहा महिने ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी रंकाळ्याला भेट दिली. त्यांना काम बंद असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. रंकाळा पर्यटन केंद्र आहे. दररोज शेकडो लोक भेट देतात. त्यामुळे येथील विकासकामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

संरक्षक भिंत व पदपथाचे काम अपुरे
अंबाई टॅंक शेजारच्या पदपथ उद्यानातून पोहण्याच्या खणीपर्यंत असणाऱ्या पदपथाचे काम वर्षापासून सुरू आहे. रंकाळा सांडव्याशेजारी झाडांच्या फांद्याखाली अर्धवर्तुळाकार आकाराचे विसावा पॉईंट बांधले आहेत. लोखंडी ग्रील बसविले आहे. पेव्हिंग ब्लॉक बसवणे, ग्रीलचे रंगकाम व उर्वरित कामे अपुरे आहे. येथे संरक्षक भिंतीचे कामही सहा महिन्यांपासून अपुऱ्या अवस्थेत आहे.

फाउंडेशनवरच काम ठप्प
रंकाळा तलावाच्या काठाने मॉर्निंग वॉकर्सचा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण व्हावा यासाठी शाम सोसायटीकडून वाहत येणाऱ्या नाला मोठा अडथळा होता. या नाल्यावर पूल उभारण्यासाठी दोन्ही बाजूला फाउंडेशनचे काम सहा महिन्यांपूर्वी केले आहे. फाउंडेशनवर पदपथाला साजेसा लोखंडी पूल उभा केला जाणार होता. मात्र सहा महिन्यांपासून फाउंडेशनवर काही काम झालेले नाही.

निर्णयाविना पाथ वे
रंकाळा मुख्य मार्गावर चौपाटीच्या कंपाऊंडला लागून पाथ वे बांधला आहे. रस्त्यावरून लोकांना ये-जा करण्यासाठी पाथ वे केला. परंतु मुख्य मार्ग अरुंद झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. खासगी जागेत पार्किंगची सोय झाल्यास हा पाथ वे ठेवला जाईल; अन्यथा तो काढून टाकण्याचे नियोजन आहे. परंतु सात-आठ महिन्यात काहीच निर्णय झाला नसल्याने पाथ वे अर्धवट अवस्थेत आहे. अनेकदा या पाथ वेवरच विक्रेते गाड्या लावतात.

चौपाटीचे काम संथ
सुवर्णमहोत्सवी रंकाळा चौपाटीच्या कामास दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. चौपाटीवरील जुनी फरशी काढून कॉंक्रिटीकरण केले आहे; परंतु पुढील लँडस्केप, लॉन, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, बसण्यासाठी स्वतंत्र बेंच आदी कामे ठप्प आहेत.

विद्युतीकरणास नाही गती
रंकाळा चौपाटी, पदपथ उद्यान, तांबट कमान व टॉवर परिसरात विद्युत करण्याचे १२० खांब उभा करून २४० दिवे लावले जाणार आहेत. यामुळे रंकाळा तलाव व टॉवर उजळून निघणार आहे. परंतु हे कामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

चौकट
कामे अनेक, ठेकेदार एक
शासनाचे विविध योजनांमधून रंकाळा विकासासाठी कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध झाला. रंकाळा विकासाची अनेक कामे आहेत; परंतु ठेकेदार एकच असल्याने कामे संथ गतीने होत असल्याचा आरोप रंकाळाप्रेमींतून होत आहे. विविध कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी विभागाचे उपशहर अभियंता यांनी सतर्क राहायला हवे. ठेकेदाराने कामाची गती वाढवायला हवी; अशी मागणी लोकांतून होत आहे.

कोट
रंकाळ्यावरील विविध विकासकामांची गती मंदावली आहे. यापुढे कामे गतीने करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
-एम. जी. फुलारी, उपशहर अभियंता, कोल्हापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT