कोल्हापूर

जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया तातडीने सुरू करा

CD

जिल्हांतर्गत शिक्षक बदली
प्रक्रिया तातडीने सुरू करा

पुरोगामी संघटनेचे ग्रामविकास विभागास निवेदन

सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. २१ ः महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपल्याने राज्यातील आचारसंहिता शिथिल करून जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना द्यावेत, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने नुकतेच ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना दिले.
११ मार्च २०२४ च्या शासन पत्रानुसार नवीन नियुक्तीपूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याबतचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनास दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्याने जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया थांबली होती. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे आता संपल्याने महाराष्ट्र राज्यातील आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना द्यावेत, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर आदींच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

SCROLL FOR NEXT