कोल्हापूर

शिक्षण विस्तार अधिकारीपदे पदोन्नतीने भरण्याची मागणी

CD

शिक्षण विस्तार अधिकारी पदे
पदोन्नतीने भरण्याची मागणी
पुरोगामी संघटनेचे शिक्षण आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ६ : शासनच्या निर्देशानुसार अनेक वर्षे रिक्त असलेली श्रेणी ३, वर्ग २ ची पदे पात्र शिक्षकांमधून पदोन्नतीने भरावीत, तसेच श्रेणी ३ वर्ग ३ ची पदे पूर्वीप्रमाणे विनाअट शिक्षकांमधून पदोन्नतीने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांच्या प्रमाणात शिक्षकांमधून श्रेणी ३ वर्ग २ व श्रेणी ३ वर्ग ३ ची शिक्षण विस्तार अधिकारी पदे मंजूर आहेत, मात्र पदे मंजूर झाल्यापासून श्रेणी ३ वर्ग २ ची पदोन्नतीने भरावयाची पदे रिक्तच आहेत. या पदांवर पदोन्नती कधीच झालेली नाही. फक्त श्रेणी ३ वर्ग ३ ची पदे विनाअट पदोन्नतीने भरली जात होती.
कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाकडे श्रेणी ३ वर्ग २ मधून पदोन्नतीची १२ पदे मंजूर असून, त्यापैकी अद्याप एकही पद भरलेले नाही. तसेच श्रेणी ३ वर्ग ३ मधून पदोन्नतीची १९ पदे मंजूर असून, पैकी ९ कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. याबाबत कार्यवाही व्हावी.
निवेदनावर राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, सरचिटणीस शारदा वाडकर, शंकर पवार, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, सरचिटणीस तुषार पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT