कोल्हापूर

नैतिक शिक्षणामुळे मानसिक, बौद्धिक विकास : भगवानभाई

CD

२३७९
कोल्हापूर : आर. के. वालावलकर प्रशाळा येथे नैतिक शिक्षणाचे महत्त्व या विषयावर भगवान भाई यांनी मार्गदर्शन केले.

नैतिक शिक्षणामुळे मानसिक,
बौद्धिक विकास : भगवानभाई
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी ता. २७ : समाजाची, जगाची परिस्थिती पाहता भौतिक विकास झपाट्याने होत आहे. भौतिक विकासाने समाजाचा विकास होत नाही, तर नैतिक शिक्षणाने मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास होतो. नैतिक शिक्षणातून गुन्हेगारीमुक्त समाज घडवता येईल. गुन्हेगारीमुक्त समाजासाठी नैतिक शिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन माउंआबू येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाचे भगवान भाई यांनी केले. आर. के. वालावलकर प्रशाळा, राजारामपुरी येथे नैतिक शिक्षणाचे महत्त्व या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘आजची तरुण पिढी वाईट संगत, व्यसनाधीनता, फॅशन यामुळे विचलित होत असून त्यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. नैतिक शिक्षण आणि अध्यात्माच्या माध्यमातूनच तरुण पिढीला योग्य दिशा मिळू शकते. सद्यस्थितीत आपण विकसित देशांच्या पंक्तीत सामील होणार आहोत. समाजातील ईर्षा, द्वेष, वैमनस्य आणि अहंकार नष्ट होऊ शकतो आम्ही प्रयत्न करत आहोत पण समाजात पसरलेली कुप्रवृत्ती आणि हिंसा ही चिंतेची बाब आहे.’’ बी. के. स्वर्णा भगिनी म्हणाल्या, ‘‘प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तणावमुक्त होण्यासाठी नैतिक शिक्षणाची गरज आहे.’’ प्राचार्य सुधाकर नथुराम म्हणाले, ‘‘नैतिक शिक्षणाअभावी मानसिक आजार होतात, शरीराचे अनेक आजार होतात आणि जीवन निस्तेज होते.’’ यावेळी वैशाली माळी, मिलिंद सनदी, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT