03312
अशैक्षणिक कामातून शिक्षकांना
मुक्त करून शिकवू द्या : पाटील
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ६ ः ‘‘राज्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओसह इतर सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करून विद्यार्थ्यांना शिकवू द्या,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. पुरोगामी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘बीएलओचे काम पूर्वप्राथमिक ते महाविद्यालयातील शिक्षकांना सम प्रमाणात द्यावयाचे शासन निर्देश असताना बहुतांश प्राथमिक शिक्षकांना हे काम देणे व शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादणे हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवरही अन्याय असल्याने यातून शिक्षकांना मुक्त करून ही कामे स्वतंत्र यंत्रणेकडे देणे हाच एकमेव पर्याय आहे.’’ राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, नेते विजय भोगेकर, शारदा वाडकर यांची मनोगते झाली.
सभेत शिक्षण सेवक कालावधीत दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना २० लाख सानुग्रह अनुदान मिळावे, मेडिकल बिल कॅशलेस पद्धत सुरू करावी, आरोग्याची समस्या असलेल्या शिक्षकांना जनगणना कामातून वगळावे आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, के. एस. पाटील, सुनील पवार, श्रीकांत टिपूगडे, संजय गांगण, रंगराव वाडकर, इरफान मिर्झा, प्रमोद मुकेमवार, गोकुळ चारथळ, देवराव आमोदे, चंद्रकांत मोरे, संघर्षकुमार सावरकर, मनोहर पेठकर, प्रदीप पवार, यशवंत पेढांबकर, शशिकांत सपकाळ, विनोद घडशी, सुरेश धुमाळ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.