कोल्हापूर

एचएफ डीलक्सची नवीन श्रेणी सादर

CD

फोटो येणार आहे........
----------
एचएफ डिलक्सची
नवीन श्रेणी सादर
पुणे, ता. ६ ः तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत व इंधन कार्यक्षम उत्‍पादनांचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ सातत्याने सादर करणाऱ्या ‘हिरो मोटोकॉर्प’ या प्रख्यात कंपनीने आज त्‍यांची लोकप्रिय १०० सीसी मोटारसायकल-एचएफ डिलक्‍सची नवीन श्रेणी लाँच केली.
एचएफ डिलक्‍सच्‍या लुकमध्‍ये अधिक भर घातल्यामुळे मोटरसायकल आकर्षक दिसत आहे. कॅन्‍व्हास ब्‍लॅक एडिशन सुधारित सुरक्षितता व सोयीसुविधा ग्राहकांना प्रदान केल्या आहेत. या मोटारसायकलमध्ये सेल्‍फ व सेल्‍फ आय ३ एस व्‍हेरियंटमधील ट्यूबलेस टायर आहेत. यूएसबी चार्जरसाठी ॲक्सेसरीज असून ग्राहकांना हिरो एचएफ-डिलक्स प्रमाणित पाच वर्षांची वॉरंटी आणि पाच मोफत सेवाही आहेत. नवीन एचएफ डिलक्स पोर्टफोलिओमध्‍ये मोटारसायकलची स्‍टाइल, सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. देशातील विश्‍वसनीय ब्रॅँडपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मोटारसायकलमध्ये उच्‍च इंधन बचत, मजबूत व शक्तिशाली इंजिन क्षमता आहे. ही मोटारसायकल देशातील हिरो मोटोकॉर्पच्या शोरूममध्‍ये किक व्‍हेरियंटसाठी ६२ हजार रुपयांपासून, तर सेल्‍फ-व्‍हेरियं‍टसाठी ६७ हजार ५५२ रुपयांपासून उपलब्‍ध आहे.
हिरो मोटोकॉर्पचे मुख्य विस्तार अधिकारी रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ‘‘किफायतशीर दरांमुळे हिरो मोटोकॉर्प ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. एचएफ डिलक्स तिची कार्यक्षमता, उच्‍च इंधन कार्यक्षमता व विश्‍वसनीय राइडसह देशातील सर्वांत विश्‍वसनीय मोटारसायकल झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT