‘ऑटोमेशन एक्स्पो’चे
मुंबईत २३ पासून आयोजन
पुणे, ता. १८ ः आशियातील दुसरे सर्वांत मोठे आणि भारतातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून प्रख्यात असलेले ‘ऑटोमेशन एक्स्पो’ २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. त्यात देशातील, परदेशातील ५०० हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
ऑटोमेशन एक्स्पो हे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरच्या २३ हजार चौरस मीटरच्या परिसरातील दोन सभागृहांमध्ये आहे. चीन, तैवान, जपान, कोरिया, यूएसए, ग्रेट ब्रिटन, इस्राईल, जर्मनी, स्वीडन, तुर्कस्तान येथील कंपन्या सहभागी होतील. ‘‘डिजिटल युगामध्ये, प्रत्येक उद्योगासाठी डिजीटलायझेनवर भर देऊन ऑटोमेशनकडे वळणे, हा एक प्राधान्यक्रम आहे. ऑटोमेशन एक्स्पो नवीन तंत्रज्ञानांचे प्रदर्शन करण्यासाठीचे व्यासपीठ असेल,’’ असे आयईडी कम्युनिकेशन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. अरोकियास्वामी यांनी सांगितले.
ऑटोमेशन एक्स्पोचे १६ वे वर्ष असून प्रामुख्याने प्रोसेस ऑटोमेशन आणि स्वतंत्र मॅन्युफॅक्चरिंग यावर लक्ष केंद्रित केले होते. आता इन्स्ट्रुमेन्टेशन अँड कंट्रोल, फील्ड इन्स्ट्रुमेन्टेशन, कंट्रोल रुम्स, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स आदी क्षेत्रांसह स्मार्ट फॅक्टरीज, रोबोटिक्स, आयआयओटी (इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्स), सायबर सिक्युरिटी, आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान अशा विषयांचा एक्स्पोमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आयईडी कम्युनिकेशन्स या संस्थेच्या संचालिका ज्योती जोसेफ म्हणाल्या, ‘‘एक्स्पोमध्ये सुमारे २० हजार उत्पादनांचे प्रदर्शन होणार असून सुमारे ५० हजार नागरिक भेट देतील, असा अंदाज आहे.’’ एक्स्पो दरम्यान विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सत्रे होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ऑटोमेशन एक्स्पोसाठी अभ्यागतांची नोंदणी अधिकृत वेबसाइटवर खुली झाली आहे. एक्स्पोला प्रवेशासाठी शुल्क नसेल. १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशिष्ट वेळ असेल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.