कोल्हापूर

शिरवळ - तांबे चोरणार्‍याचे पितळ उघडे - चार जण ताब्यात

CD

शिरवळ चोरीप्रकरणी
कोल्‍हापुरातून चौघे ताब्यात
शिरवळ, ता. २१ : येथील निसार ट्रान्सफॉर्मर प्रा. लि. कंपनीतील १० लाख ५८ हजार रुपये किमतीचे कॉपर (तांबे) चोरीचा गुन्हा दोन दिवसांत उघड करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले. चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून या टोळीतील तीन संशयितांसह चोरीचा माल विकत घेणारा एक जण अशा चौघांना शिरवळ पोलिसांनी कोल्हापूरातून ताब्यात घेतले आहे. अविनाश दीपक मछले ऊर्फ कोकाटे (वय २४), स्वप्नील महेश गारुंगे (२३, दोघेही रा. एसएससी बोर्डाजवळ, राजेंद्रनगर), शिवाजी प्रभू तारे (४२, रा. साळुंके कॉलनी, भारतनगर कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. विनायक बाळासो गोसावी (४२, रा. गुटकेश्‍वर कॉलनी, शिंगणापूर) खरेदीदार आहे.शिरवळ (ता. खंडाळा) च्या हद्दीतील निसार ट्रान्सफॉर्मर कंपनीत १२ ऑगस्टला रात्रीच्या वेळी चोरट्यांनी प्रवेश करून तांब्याच्या तारा व पट्ट्या तसेच बॉबीचे बन्डल असे एकूण १० लाख ५८ हजार ४०० रुपये किमतीचे सुमारे एक हजार ५१२ किलोचे तांबे चोरून नेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

रेकॉर्डवरच्या शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Buldhana road accident news: नांदुरा-जळगाव जामोद महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; २१ वर्षीय युवक ठार, तिघे गंभीर जखमी

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

SCROLL FOR NEXT