साखर निर्यात बंदीचा
थेट फटका शेतकऱ्यांना
शेट्टी ः कारखाने पैसे कसे देणार?
पुणे, ता. १४ : ‘‘साखरेचा किमान आधारभूत दर (एमएसपी) गेल्या चार वर्षांपासून वाढलेला नाही, त्यातच केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातल्याने साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण होतील. त्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल,’’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे व्यक्त केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देशात १२ हजार कोटी, तर राज्यात तीन हजार कोटी रुपयांची देयके कारखानदारांकडे थकीत असल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, ‘‘यावर्षी साखरेचे उत्पादन घटले असले, तरी जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला भाव आहे. तरीही केंद्राने साखर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांवर होणार असून, साखरेचे भावच वाढले नाहीत, तर कारखाने शेतकऱ्यांना पैसे कसे देणार? सरकारने या निर्णयाबाबत तातडीने विचार करावा. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असताना दुसरीकडे कारखानदारांकडून उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) वेळेवर दिला जात नाही. चौदा दिवसांच्या पुढे थकबाकी ठेवल्यास कारखान्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे; मात्र राज्यातील बहुतांश कारखाने सत्ताधाऱ्यांचे आहेत. त्यामुळे कोणतीच कारवाई होत नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.