शीतल तेजवानीला जामीन
पुणे, ता. १८ : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानीला केलेली अटक आणि पुणे न्यायालयाने दिलेली कोठडी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविली आहे. न्यायमूर्ती एन. जे. जामदार यांनी तेजवानीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाची ४० एकर जमीन परस्पर पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीला विकताना कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क चुकवून सरकारची फसवणूक केली. याप्रकरणी तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील आणि तत्कालीन सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेजवानीने ॲड. अजय भिसे व ॲड. दीपाली केदार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत बावधन पोलिसांच्या कारवाईबाबत याचिका दाखल केली होती. सेवा विकास सहकारी बँकेत सव्वासात कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आर्थिक गुन्हे शाखेने तेजवानीला केलेली अटक आणि पुणे विशेष न्यायालयाने दिलेली कोठडीही न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे..