कोल्हापूर

ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी प्रयत्नशील.... अमोल कोल्हे

CD

3268

नेबापूर : वीर शिवा काशीद समाधीस्थळी पायऱ्या टप्पेकरणाचा प्रारंभ करताना खासदार अमोल कोल्हे व नाभिक महामंडळाचे पदाधिकारी.

...

पुरातत्त्व खाते -प्रशासनात सुसूत्रता आवश्यक

खासदार अमोल कोल्हेः वीर शिवा काशीद समाधीस्थळी पायरी मार्ग टप्पेकरणाचा प्रारंभ

पन्हाळा: ता.१०ः ‘गड -किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खाते आणि प्रशासन यांच्यात सुसूत्रता असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन गड किल्ल्यांवरील ऐतिहासिक वास्तू संवर्धन गतिमान करण्याकामी प्रयत्नशील असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी पन्हाळा येथे सांगितले.
पन्हाळगडाखालील नेबापूर येथील वीर शिवा काशीद समाधीस्थळी पायरी मार्ग टप्पेकरणाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. खासदार कोल्हे यांनी स्वतःच्या खासदार फंडातून दहा लाख रुपये या कामासाठी दिले असून अन्य कामासाठीही निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या हस्ते यावेळी टप्पेकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्र नाभिक महामंडळांच्या वतीने समाधी परिसरात सेन्सरवर चालणारे सोलर दिवे, बगीचा आणि समाधी परिसर खचू नये म्हणून उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार कोल्हे याना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, विजय दाभोळकर, सयाजी झुंझार, मारुतीराव टिपुगडे, बाबासाहेब काशीद, विजय संकपाळ, विवेक सूर्यवंशी, संतोष चव्हाण, सुनिल, इंगळे, निशांत मोहिते,भीमराव काशीद, रामचंद्र काशीद आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

SCROLL FOR NEXT