कोल्हापूर

तब्बल पन्नास वर्षांनी पन्हाळगडावर साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन

CD

03383

पन्हाळगडावर पन्नास वर्षांनी शिवराज्याभिषेक दिन
शिवसेना ठाकरे गटाचा पुढाकार; दुग्धाभिषेक, युद्धकलेची प्रात्यक्षिके

आपटी, ता. ६ ः पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच १९७४ मध्ये पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने व तत्कालीन पन्हाळ्याचे नगराध्यक्ष मदनमोहन लोहिया याच्या पुढाकाराने त्रिशतकीय शिवराज्याभिषेक दिन साजरा केला होता.तब्बल पन्नास वर्षानंतर आज पहिल्यांदाच पन्हाळगडावर शिवसेना ठाकरे गटाचे पुढाकाराने ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला.
ठाकरे गटाने ३५० व्या शिवराज्याभिषेकनिमित्त दोन दिवस पन्हाळगडावर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. आज दक्षिण भारतातील जिंजी, तंजावर, बेंगलोर फोर्ट, साजरा गोजारा किल्ला, वेल्लूर, सर्जाकोट, राजकोट व महाराष्ट्रातील राजगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांवरून आणलेल्या पवित्र जलकलाशांचे मंत्रोच्चारात शिवमंदिराजवळ पूजन केले. जिल्हाध्यक्ष संजय पवार, रविकिरण इंगवले, सुनील मोदी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते पारपडलेल्या कलश पूजनाचे पौरोहित्य ओंकार स्वामी व प्रभुलिंग स्वामी यांनी केले. त्यानंतर पन्हाळगडावरील ताराराणी राजवाड्यासमोरील शिवमंदिरातील छत्रपतींच्या पुतळ्यास पवित्र जलाभिषेक व दुग्धाभिषेक केला. यावेळी शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. लेझमीच्या ठेक्यात व पारंपरिक वाद्यांच्या गजरात सवाद्य छत्रपतींच्या पालखीची मिरवणूक काढली. अंबाबाई मंदिराजवळ पालखी सोहळ्याने शिवराज्याभिषेक दिनाची सांगता झाली.
यावेळी ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, दिनेश साळोखे, गोविंद वाघमारे, सुरेश पोवार, भरत आमते, रणधीर पाटील, बाजीराव पाटील, कमलाकर जगदाळे, दत्ताजी टिपूगडे, धनाजी दळवी, दीपक गौड, स्वरूप मांगले, मंजित माने, प्रशांत पोवार, भरत भापकर, शशिकांत बिडकर, सुरेश कदम, किशोर माने, दीपाली शिंदे, शुभांगी साळोखे, प्रीती क्षीरसागर, पप्पू नाईक, भीमराव पाटील, कृष्णात जासूद, प्रदीप हांडे, सुनील जोशी, राजू सांगावकर, दिलीप देसाई, विवेक काटकर, महेश उत्तुरे, रघुनाथ टिपूगडे यांच्यासह शिवप्रेमी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT