कोल्हापूर

मूलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या स्वप्नांना बळ द्या:तहसीलदार माधवी शिंदे

CD

तनिष्काचा लोगो वापरावा
03610
मुलांना स्वावलंबी बनवून
त्यांच्या स्वप्नांना बळ द्या

तहसीलदार माधवी शिंदे ः पिंपळे तर्फ ठाणेत स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. २५ ः मुलांना शाळेतील शिक्षणासोबतच अवांतर विषयही शिकवा. मुलं आपले अनुकरण करतात. त्यांना चांगल्या कृती शिकवा. मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या स्वप्नांना बळ द्या, असा सल्ला तहसीलदार माधवी शिंदे - जाधव यांनी दिला. ‘सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठातर्फे गणेशोत्सवानिमित्त पिंपळे तर्फे ठाणे येथील श्रीमंत संजयसिंह गायकवाड माध्यमिक विद्यामंदिरात माता पालक मेळावा व झिम्मा फुगडी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी त्या बोलत होत्या.
झिम्मा फुगडी स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सीमा शिंदे, डॉ. श्रुतिका कळेकर, मुख्याध्यापक ए. एम. रणदिवे उपस्थित होते. डॉ. कळेकर म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांची आवड ओळखून प्रोत्साहन द्या. त्यांना मोबाईल देणे टाळा.’ एम. पी. लाड यांनी प्रास्ताविक, डी. एल. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेघा शिंदे व शकुंतला पाटील यांनी परीक्षण केले. ए. एस. पोवार यांनी आभार मानले. समन्वयक सुशांत पाटोळे यांनी संयोजन केले. यावेळी तनिष्का गटप्रमुख नीता पाटील, सदस्या रेश्मा पाटील, अश्विनी पाटील, अनिता पाटील, शुभांगी शिंदे, शशिकला पाटील, गीता पाटील, अनिता पाटील, शिवानी पाटील, रेश्मा पाटील उपस्थित होत्या.
------
स्पर्धेतील विजेते असे ः पिंगा ः लहान गट - राजमुद्रा ग्रुप, मोठा गट - राजलक्ष्मी ग्रुप, झिम्मा ः लहान गट - भागीरथी ग्रुप, मोठा गट - शिवलक्ष्मी ग्रुप. फुगडी ः लहान गट -आरती पाटील, अनुजा पाटील. मोठा गट -श्रुती पाटील, संध्या कांबळे. काटवटकणा ः लहान गट - आराधना काळे, संस्कृती पाटील. मोठा गट - क्रांती कांबळे, विद्या पाटील.
पन्हाळा ः बक्षीस वितरण करताना तहसीलदार माधवी शिंदे व स्पर्धक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT