04139, 04140
...
पोर्ले तर्फ ठाणे खूनप्रकरणी
चार संशयितांना अटक
चौघांना चार दिवसांची कोठडी, तर एका संशयिताचा शोध सुरू
पन्हाळा, ता. २१ : तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रविवारी (ता. १९) सायंकाळी एका युवकाचा दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. या खुनानंतर पसार झालेल्या पाच संशयित आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात पन्हाळा पोलिसांना यश आले. यातील मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यरात्री ताब्यात घेतले तर एकजण अद्याप पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. ताब्यात असलेल्या चार संशयितांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची चार दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोर्ले तर्फ ठाणे येथे रविवारी सायंकाळी विकास आनंदा पाटील (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) या युवकाचा जबरी मारहाणीत खून झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयित युवराज शिवाजी गायकवाड (वय ३४, रा. पोर्ले तर्फ ठाणे) व त्याचे साथीदार ओंकार शिवाजी वरुटे (वय २५, रा. आरे, ता. करवीर), शरद बळवंत पाटील (वय ३७, रा. पोर्ले तर्फ ठाणे), सोमनाथ पंडित वरुटे (वय २७, रा. आरे, ता. करवीर) व पंढरीनाथ कांबळे हे पाच संशयित घटनेच्या दिवसापासून पसार होते. त्यापैकी प्रत्यक्ष मारहाणीत सामील असलेला ओंकार वरुटे, कटात सामील असलेला सोमनाथ वरुटे व मृत विकासवर लक्ष ठेवणारा शरद पाटील यांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली. तर मुख्य संशयित युवराज गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मात्र, मारहाणीत सामील असलेला गायकवाड याच्या जेसीबीचा चालक पंढरीनाथ कांबळे हा अद्याप पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.