04417
आयुष्यात मोठे होण्याचे
स्वप्न बाळगा : चितळे
‘संजीवन’मध्ये पाच दिवसांचा इंडक्शन प्रोग्रॅम
पन्हाळा, ता. ४ ः ‘‘इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना असे शिक्षण घ्या जे तुम्हाला अभिमानाने जगायला शिकवेल. फक्त इंजिनीअर न होता सोशल इंजिनिअर होऊन आयुष्यामध्ये मोठे होण्याचे स्वप्न बाळगा,’’ असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गिरीश चितळे यांनी केले. ते सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये पाच दिवसांच्या इंडक्शन प्रोग्रॅमअंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी गिरीश चितळे यांचा सत्कार झाला. ‘संजीवन’ने आयोजित केलेल्या इंडक्शन प्रोग्रॅममध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आमंत्रित केले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून इंजिनिअरींगच्या शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात विद्यार्थ्यांनी कसे यश मिळवावे, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. संजीव जैन यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रा. एकनाथ साळुंखे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि २५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुधीर नांगरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.