कोल्हापूर

पन्हाळागडावरील तीनदरवाजा मार्ग शनिवारी राहणार वाहतूकीसाठी बंद

CD

04419


तीन दरवाजा मार्ग आज बंद
पन्हाळा तहसीदारांचा आदेश; युनेस्को'' पथकाच्या भेटीची पार्श्वभूमी

सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा ता. ४ : ‘युनेस्को’ जागतिक वारसा नामांकन पाहणी दौऱ्यासाठी तज्ज्ञांचे पथक शनिवारी (ता. ५) पन्हाळगडाला भेट देणार आहे. या पथकाकडून पन्हाळ्यावरील प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून माहिती घेणार आहे. या अनुषंगाने तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी पन्हाळागडावरील तीनदरवाजा मार्ग शनिवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र शासनाने महाराष्ट्रातील भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या सदराखाली महाराष्ट्र राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला व तामिळनाडूतील जिंजी या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. याच अनुषंगाने युनेस्को तज्ज्ञांचे पथक पन्हाळगडाला भेट देण्यासाठी शनिवारी येत आहे. या पथकात युनेस्कोची सल्लागार असलेल्या बिगरशासकीय असलेल्या इंटरनॅशनल कॉन्सिल ऑन मॉनिमेंट अँड साईटस (ICOMOS) चे सदस्य असणार आहेत. या पथकाचा पन्हाळागडावरील पाहणी दौरा निर्विघ्न पार पडावा, यासाठी पन्हाळ्यावर नगरपरिषदेबरोबरच सर्वच शासकीय कार्यालये सज्ज झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पन्हाळगाडाचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार असलेल्या तीनदरवाजा मार्ग शनिवारी सकाळी सात वाजलेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीदार माधवी शिंदे जाधव यांनी दिले आहेत.

चौकट
पथकाची येथे भेट
हे पथक प्रामुख्याने पन्हाळगडावरील धर्माकोठी, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, अंबरखाना, अंधारबाव, तीन दरवाजा, चार दरवाजा आदी ऐतिहासिक वास्तूंना भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT