कोल्हापूर

पन्हाळ्यासाठी लवकरच कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहीका देणार :मा.ना. प्रकाश आबिटकर

CD

04713
पन्हाळ्यासाठी कायमस्वरूपी
१०८ रुग्णवाहिका देणार

मंत्री प्रकाश आबिटकर; माजी नगराध्यक्षांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा प्रतिसाद

पन्हाळा, ता. १८ ः येथील ग्रामीण रुग्णालयातील उपचारासाठीच्या सोयी-सुविधांबद्दल मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले. त्यांनी प्रतिसाद देत पन्हाळ्यासाठी कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले.
माजी नगराध्यक्ष मोकाशी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ऐतिहासिक पन्हाळगडावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेस कंत्राटीस्वरुपी चालक आहे. रात्री अपरात्री येणाऱ्या अत्यअवस्थ रुग्णांना कोल्हापूरला पाठवण्यासाठी चालकास बोलावून घ्यावे लागते. चालक येण्यास व रुग्णाला पाठवण्यास वेळ लागतो. पूर्वीची १०८ रुग्णवाहिका काही वर्षांपासून बंद आहे. हृदयविकार,पक्षाघात यांचा तीव्र झटका आलेल्या रुग्णास पन्हाळा ग्रमीण रुग्णालयात आत्यावश्यक सेवा उपलब्ध होत नसल्याने जीव गमवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पन्हाळ्यात १०८ रुग्णवाहिका कायमस्वरुपी द्यावी .अथवा सध्या असलेल्या रुग्णवाहिकेस कायमस्वरुपी २४ तास चालक उपलब्ध देण्याबाबत संबंधितांना आदेश व्हावेत. ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्यवस्थ व गंभीर आजारी रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांची मागणी केली आहे. निवेदन स्वीकारताच प्रकाश आबिटकर यांनी मोकाशी यांना पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील सर्व समस्या दूर करण्याचे व कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मोकाशी, माजी नगरसेवक अकबर मुजावर, नवेज मुल्ला व अस्लम मुल्ला उपस्थित होते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT