कोल्हापूर

पन्हाळगडावरील गाईडने दाखवला प्रामाणिकपणा सापडलेल्या पर्ससह आडीच लाखाचा ऐवज केला परत

CD

05014

अडीच लाखांचा ऐवज
पर्ससह केला परत

पन्हाळगडावरील गाईडचा प्रामाणिकपणा

पन्हाळा, ता. ३१ ः सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी येथील निसार नगारजी या गाईडने अडीच लाखांच्या ऐवजासह पर्स परत करत प्रामाणिकपणा दाखवला.
पन्हाळगडावर सुटीमुळे नेहमी गर्दी असते. येथे तबक उद्यान परिसरात एका महिलेची पर्स पडली. याची त्या महिलेला जाणीव नव्हती. त्याच परिसरात निसार नगारजी हा गाईड दुसऱ्या पर्यटक कुटुंबाला घेऊन गेला होता. त्याला तिथे काळ्या रंगाची पर्स सापडली. ती त्याने उचलून थेट गस्तीसाठी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिली. यादरम्यान तेथे पर्स गहाळ झालेली महिला आली. निसारने त्यांना धीर देत सरळ पन्हाळा पोलिस ठाण्यात आणले. सापडलेली पर्स त्यांची असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ओळख पटवून पर्स महिलेच्या स्वाधीन केली. पर्समध्ये दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व ८० हजार रुपये रोख रक्कम असा अडीच लाखांचा ऐवज होता. निसारने पर्स परत करून प्रामाणिकपणा दाखला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT