दुसरी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध
परिषद ‘संजीवन’मध्ये संपन्न
पन्हाळा, ता. १६ ः सोमवार पेठ थील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नवीन संधी विषयावर दुसरी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद उत्साहात झाली. शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचा उद्देश आणि संस्थेची वाटचाल याबद्दल डॉ. अजित काटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले उपस्थित होते.
सहसचिव एन. आर. भोसले यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतलेल्या सर्वांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्यामुळे दुसरी परिषेद घेण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरण आणि बदलते शिक्षणाचे प्रवाह यामध्ये संशोधन प्रक्रियेला अतिशय महत्त्व दिले जात आहे. परिषदेमध्ये सादर होणाऱ्या संशोधन पेपरमधून विद्यार्थी आणि समाजाला चांगला बोध मिळेल; अशी आशा आहे.’ आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी शोधनिबंध सादर केले. परिषदेचे आयोजन डिप्लोमा विभागाचे प्राचार्य प्रा. निशांत थरकार, रिसर्च आणि डेव्हलपमेंट अधिष्ठाता डॉ. अजित काटकर, विभागप्रमुख यांनी केले होते. चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. संजीव जैन, रजिस्ट्रार दीपक पाटील यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.