कोल्हापूर

पोर्ले-परिसंवाद

CD

02508

दत्त दालमियामध्ये ऊसपीक परिसंवाद
पोर्ले तर्फ ठाणे, ता. ३ ः कमी वयाचे आणि चांगल्या गुणवत्तेचे बेणे वापरल्यास उसाची उगवण ९० टक्के चांगली होते. त्याचे तीन ते चार खोडवे पीक घेता येत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते. एक डोळा अथवा रोप लागण पध्दतीचा अवलंब करावा. त्यामुळे पन्नास टक्के बेणेसह खर्चात बचत होते. रोपलागण पद्धत आडसाली आणि पूर्वहंगामासाठी फायदेशीर ठरत असल्याचे मत कृषितज्ज्ञ अरुण देशमुख यांनी व्यक्त केले.
आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना, दालमिया फौडेशन, नेटाफिम इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ले (ता. करवीर) शेतकरी मेळाव्‍यात ते बोलत होते. यावेळी अनुदान तत्त्वावर औषध फवारणी स्प्रे पंप, उसरोपे आणि माती परीक्षण प्रमाणपत्र वाटप झाले. अध्यक्षस्थानी युनिट हेड एस. रंगाप्रसाद होते. त्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी विकास योजनांचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी कृषी योजनाची माहिती दिली. शाश्वत ऊस विकास कार्यक्रमातर्गंत अनुदानावर यंदा ३० लाख रोपे वाटप करेल. एक हजार शेतकऱ्यांचे मातीचे परीक्षण, पाच वर्षात एक हजारहून अधिक स्प्रे पंप वाटप केले असून यंदा एक हजारचे उद्दिष्ट असल्याची माहिती शेती खातेप्रमुख संग्राम पाटील यांनी सांगितली. यावेळी सहयोगी संचालक डॅा.अशोककुमार पिसाळ यांचे मार्गदर्शन झाले. कारखाना एच. आर. प्रमुख सुहास गुडाळे, चीफ इंजिनियर शिवप्रसाद पडवळ, मनकंदन, नेटाफेमचे एरिया मॅनेजर प्रशांत पाटील, नितीन कुरळूपे, प्रसाद मिरजकर, एम. एम. पाटील, शिवाजी चौगुले आदींसह केन इन्स्पेक्टर, गटप्रमुख, मदतनीस, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. सीनियर मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT