कोल्हापूर

पोर्ले -यात्रा

CD

02709

मसाईदेवी यात्रेची
ींपोर्ले तर्फ ठाणेत तयारी
पोर्ले तर्फ ठाणे ता. २८ : येथील जागृत ग्रामदैवत श्री मसाईदेवीची यात्रा गुढीपाडव्यानिमित्त रविवारी (ता. ३०) होत आहे. या पार्श्वभूमीवर पोर्लेतील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी कासारी नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे पोर्ले तर्फ ठाणे. महिषासुरमर्दिनीच्या रुपात देवीने पौरासुराचा वध येथेच केला. म्हणून या गावाला पोर्ले तर्फ ठाणे असे ओळखले जाते. प्राचीन काळी महिषासुरमर्दिनी शब्दाचा अपभ्रंश होऊन ''मसाई'' असे नाव पडल्याची अख्यायिका आहे. चैत्रातील प्रतिपदेला ग्रामदैवत मसाईदेवीची येथील गुरव समाजाकडून पूजा बांधली जाते. यात्रेनिमित्त संध्याकाळी शेवाळे, काशीद, चेचर, साळोखे, चौगुले, खवरे, घाटगे-पाटील, भागोजी बुवा माळ,हरिहर पाणी पुरवठा यांचे सजवलेले गाडे, बैलजोड्या व देवीची पालखी मंदिरापर्यंत नेली जातात. यात्रा पन्हाळा तालुक्यात मोठी असल्याने नामवंत बैलजोड्या यात्रेत पहायला मिळतात. ग्रामपंचायतीकडूनही काही मंडळात बैलगाडी, घोडागाडी शर्यतीसह मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी जंगी कुस्ती मैदान असते. यात्रेत खेळणी, पाळणे, विविध वस्तूंचे दुकाने लावली जातात. यात्रेनिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

EPFO PF Withdrawal New Rule : पीएफ काढण्याच्या नियमात बदल; आता 'या' फॉर्मशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत पैसे

Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

SCROLL FOR NEXT