02310
आदर्श गुरुकुल विद्यालय जिल्ह्यात प्रथम
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम ः विभागीय स्तरावर निवड
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. २५ : येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जिल्ह्यात आदर्शवत ठरली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या शाळेची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
यापूर्वी केंद्र व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. या आयएसओ मानांकन प्राप्त शाळेने आतापर्यंत महाराष्ट्र शासन शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, एक लाख चार हजार ४४४ सूर्यनमस्कार या अनोख्या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. शिव विचार दौड व ५५५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिवचरित्र पारायण सोहळा साजरा केला. या उपक्रमाची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. मुख्याध्यापक संघाकडून स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समितीकडून इको फ्रेंडली व ग्रीन स्कूल ॲवॉर्डने सन्मानित केले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, वेस्ट वॉटर पुनर्वापरासाठी इटीपी प्रकल्प, मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा, माजी विद्यार्थी मेळावे, विविध देशी व विदेशी खेळांमार्फत हजारो विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाले आहेत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत शाळेतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
या कामगिरीसाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, मुख्याध्यापिका एम. डी. घुगरे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. पर्यवेक्षक एस. जी. जाधव व प्रशासक ए. एस. पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.
---------------
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत आमची शाळा जिल्ह्यात पहिली आली आहे. ही बाब आनंदाची आहे. आम्ही राज्याची तयारीही केली आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही राज्यातही यशस्वी कामगिरी नक्की करणार आहे.
- महानंदा घुगरे, मुख्याध्यापिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.