कोल्हापूर

पिंपळाच्या झाडास जीवदान

CD

02319

पिंपळाच्या झाडास जीवदान
निसर्गप्रेमी मित्रचा उपक्रम ः भादोले-पेठवडगाव रस्त्याकडेला पुनर्रोपण
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. २ : येथील निसर्गप्रेमी मित्र ग्रुपतर्फे तोडून टाकलेल्या पिंपळाच्या झाडाचे पुनर्रोपण करून त्या झाडास जीवदान दिले. निसर्गप्रेमी मित्र ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील व त्यांच्या टीमने घेतलेल्या प्रयत्नाला यश आले.
लाटवडे रोडला पिंपळाच्या झाडाचा मोठा बुंधा पडल्याची माहिती डॉ. अमोल पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मोरी बांधकामावेळी हे झाड अर्धवट तोडले गेले होते. मुळ्या बांधकामातून तुटून पडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत त्या झाडाला पालवी फुटलेली होती. दुर्लक्ष झाले असते तर ते झाड उन्हाच्या तडाख्यात पाण्याअभावी मेले असते. त्यामुळे त्याला जीवदान देण्यासाठीची धडपड सुरू झाली. या ग्रुपने झाडाला भादोले-पेठवडगाव रस्त्याकडेला श्रीपती इंटरप्राईजेसचे सागर पाटील यांच्या अंगणात पुनर्रोपण केले. झाडासाठी लागणारा खड्डा जेसीबीने काढला. त्याचा खर्च सागर पाटील यांनी केला. झाडासाठी लागणारी खते, बुरशीनाशके शेती भांडारचे मालक नीलेश घारसे यांनी दिले.
उपक्रमात प्रकाश जगदाळे, संदीप पाटील, नेताजी पाटील, डॉ. नीलेश ढोबळे, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. विशाल पाटील, राजेंद्र भोसले आदींनी परिश्रम घेतले.
------------
सात झाडांचे पुनर्रोपण
निसर्गप्रेमी मित्र संस्थेने पेठवडगाव परिसरात आतापर्यंत वड, पिंपळ, मोह अशा सात झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. निसर्गप्रेमी संस्थेमार्फत देवराई निर्मिती, फुलपाखरू उद्यान, वृक्षतोड विरोध, वृक्ष पुनर्रोपण, गडमोहीम, स्वच्छता अभियान असे २२ उपक्रम राबवण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT