कोल्हापूर

पेठवडगाव:एकाच कुटूंबातील पाचजन बेपत्ता

CD

नात्यातील चार मुलींना घेऊन
विवाहित महिला बेपत्ता

पेठवडगाव, ता. २३ : मैत्रिणीकडे जातो असे सांगून विवाहित महिला नात्यातील चार मुलींना घेऊन बेपत्ता झाल्याची घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांपैकी दोन वर्षांच्या मुलीसह तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यामुळे खळ-बळ उडाली आहे.
सौ. काजल राकेश जाधव (वय २५), त्यांची मुलगी नायरा (२), पुतणी नेहा लक्ष्मण जाधव (१५), तिची बहिण अर्पिता (१४), चुलत बहीण शीतल दिलीप जाधव (१६, सर्व रा. सध्या मिणचे, मूळ गाव निगडेवाडी, उचगाव, करवीर) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.
वडगाव-मिणचे रोडवर मिणचे हद्दीत वसंत जाधव यांचा विटभट्टी व्यवसाय आहे. राकेश सावकार जाधव (२६) हे कुटुंबासह मजूर म्हणून कामास आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची पत्नी काजल या मैत्रीण मीना पोवार यांच्याकडे जाऊन येतो असे सांगून गेल्या. त्यांच्यासोबत लहान मुलगी व तीन मुली नेहा, अर्पिता, शीतल यांनाही त्या सोबत घेऊन गेल्या. त्या रात्री उशिरापर्यंत परत आल्या नाहीत. म्हणून राकेश यांनी तिच्या मैत्रिणीस संपर्क केला असता त्या नसल्याचे उघडकीस आले. नातेवाईकांनी शोधा-शोध करूनही त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा वडगाव पोलिस ठाण्यात वर्दी दिली. बेपत्ता होण्याचे कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलिस त्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT