कोल्हापूर

पेठवडगाव:प्रामाणिकपणे पैसे परत केले

CD

02539

शीतल शिंदेंनी प्रामाणिकपणे परत केली
रक्कम, किमती साहित्य असलेली पर्स

पेठवडगाव, ता. २२ : येथील एका महिलेची सापडलेली पर्स शीतल सुनील शिंदे यांनी प्रामाणिकपणे परत केली. पर्समध्ये दोन हजार रोख व किमती साहित्य होते. पतीप्रमाणे पत्नीनेही सापडलेले पैसे परत करून पतीची परंपरा कायम ठेवली.
येथील ‘सकाळ’चे कर्मचारी सुनील शिंदे यांच्या पत्नी शीतल या सोमवारी रात्री कामानिमित्त वाणीपेठ रस्त्याने जात होत्या. या दरम्यान त्यांना पर्स सापडली. ती कोणाची आहे याचा शोध त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना कोणीही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी शशी लोहार हीची पर्स हरवल्याचे लक्षात आले. या महिलेची परिस्थिती बेताची असून, ती दीपावलीचा बाजार करण्यासाठी जाताना तिची पर्स पडल्याचे सांगितले. तिची असल्याची खात्री करून ती पर्स परत केली.
दीपाली यांचे पती सुनील यांना २००७ मध्ये मार्केट यार्ड परिसरात एक लाख रुपये सापडले होते. ते त्यांनी संबंधितांना परत केले. त्यानंतर त्यांना पार्वती टॉकी येथे रोख रक्कम सापडली. ती मंदिरात दान केली. पेठवडगाव व पुणे येथे अशाच पद्धतीने त्यांना रोख रक्कम व मोबाईल सापडला होता. तो त्यांनी परत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT