कोल्हापूर

तिरपण येथील वाघसदृश्य प्राणी तरस .

CD

तिरपण येथील ‘तो’ प्राणी
तरस असल्याचे स्पष्ट

पुनाळ,ता. १८: तिरपण ( ता.पन्हाळा) येथे वारंवार दिसून येणारा प्राणी वाघ नसून तरस असल्याचे स्पष्ट झाले. गेले दहा दिवस परिसरात वाघसदृश प्राणी आल्याने लोकांच्यात भितीचे वातावरण होते. वैरण आणणे, उसाला पाणी देणे, शेतीची मशागत आदी कामे भितीमुळे खोळंबली होती.
दरम्यान, पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव टीमचे प्रदीप सुतार व सहकारी यांनी रात्री उसात ठसे मिळतात का पाहिले असता ते ठसे तरस या प्राण्याचे असल्याचे स्पष्ट झाले. रेस्क्यू टीम सदस्य प्रदीप सुतार म्हणाले, ‘आठ -दहा दिवसांपासून भागात दिसणारा वाघसदृश प्राणी वाघ नसून तरस आहे. त्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. तरस माणसांवर हल्ला करत नाही. तो सडलेले मांस वगैरे खातो. तरीदेखील शेतावरील वस्तीवर लहान पाळीव प्राण्यांना ठेऊ नका. त्यांच्यावर ते हल्ला करु शकतात.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : मंगळुरू कुकर स्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीकला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT