कोल्हापूर

अनुदानाच्या जाचक अटींपासुन सभासदांना मुक्त करा -अरुणकुमार डोंगळे: कसबा ठाणे येथे गोकुळचा मेळावा.

CD

04697
अनुदानाच्या जाचक अटींपासून मुक्त करा
अरुणकुमार डोंगळे : कसबा ठाणेत गोकुळचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
पुनाळ, ता. २ : गायीच्या दुधावरील अनुदानानिमित्त सभासदांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी केली. कसबा ठाणे(ता. पन्हाळा) येथील गुरुकृपा कार्यालयातील पन्हाळा-शाहुवाडी तालुका दूध संस्था सचिव, अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
अरुणकुमार डोंगळे म्हणाले, ‘दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करण्याचे विधिमंडळात जाहीर केले. पण अनुदान देताना जाचक अटी घातल्या. त्यामुळे अनुदानापासून सभासद वंचित राहणार असल्याने अटी रद्द करण्याची मागणी मेळाव्यात झाली. ज्या सभासदांच्या गाईचे दुधाचे फॅट ३.२ व ८.३ व एसएनएफसाठी २९ रुपये दर दूध उत्पादक सभासदांच्या वैयक्तीक खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी दूध उत्पादक सभासदांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड व पशुधन इअर टॅगींगशी लिंक असणे बंधनकारक आहे. अशा जाचक अटी दूध उत्पादक सभासदांना घालण्यात आल्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. परिणामत: सभासदांना आर्थिक नुकसान होणार आहे.’ यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, बयाजी शेळके, चेतन नरके, अमरसिंह पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पन्हाळा - शाहूवाडीतील दूध उत्पादक सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT