05509
भुईमूग, सूर्यफूल पिकांना कोंब
पुनाळ परिसरातील चित्र; पंचनामे करण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
पुनाळ, ता. २३ : मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर शेतीकामांनी गती घेतली असताना अचानक मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेती कामांमध्ये व्यत्यय आला आहे. काढणीस आलेल्या पिकांना याचा जास्त फटका बसला आहे. भुईमूग, सूर्यफूल यांना कोंब आले आल्याने शेतकरी हताश झाल्याचे चित्र आहे. नुकसानीचा पंचनामा करून वेळेत नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
परिसरात उन्हाळी भुईमूग, नाचणी, सूर्यफूल, भात आदी पिके परिपक्व झालेली असल्याने पिके काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. काढणीस आलेली पिके पदरात पाडून घेऊन वर्षाची बेगमी शेतकरी करत आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने पिकांच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. असे असताना मॉन्सूनपूर्व पाऊस दमदारपणे लागत असल्याने शेतात पाणी साचले आहे. पावसाचा नेमका वेळ नसल्याने कामामध्ये सूत्रबद्धता नाही. पाऊस दुपारीच हजेरी लावत असल्यामुळे मजूर बसून राहत आहेत. काम कमी व दाम अंगावर] अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. पावसाचा फटका कधीही बसत असल्याने कामाची लगबग सुरू आहे. दिवसभर प्रचंड उष्मा असल्याने सायंकाळी किंवा रात्री हमखास पाउस पडतो. असे विचित्र वातावरण असल्याने कामाचा वेग वाढविण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतमजूर मिळत नसल्याने पैरा पद्धत रुढ होत आहे. पावसाचे वातावरण रोजच होत असल्याने पिके काढून घरी आणण्याची वेळ आली आहे. भुईमूग, सूर्यफूल यांना कोंब आले असल्याने पिकांबरोबर शेतकऱ्यांनीही मान टाकल्याचे विदारक चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.