कोल्हापूर

रस्ता खुला न केल्यास रांगोळी बंद, रास्ता रोको

CD

रस्ता खुला न केल्यास
रांगोळी बंद, रास्ता रोको
शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा
रांगोळी, ता. १८ ः येथील रांगोळी जंगमवाडी बंद रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता खुला न केल्यास गावबंद व रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
रांगोळी जंगमवाडी रस्ता शेतकऱ्यांनी तारेचे कुंपण घालून बंद केला आहे. यावरुन पंधरा दिवस वाद सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदारांकडे दाद मागितली होती. तहसीलदार यांनी अंतरीम निकाल होईपर्यंत तात्पुरता रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. यामुळे मंडळ अधिकारी अजित साठे यांनी पोलिस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचे प्रयत्न केले. परंतु तेथील शेतकऱ्यांनी विरोध करीत रस्ता खुला करु दिला नाही. यातच न्यायालयाने रस्ता खुला करण्यासंदर्भात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिला आहे. यामुळे गावातील शेतकऱ्यांची सुरू असलेली ऊसतोड रस्त्याअभावी बंद करावी लागत आहे. प्रशासनाने रस्ता खुला न केल्यास गुरुवारपासून (ता. २१) गावबंद व रास्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबत निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, अप्पर तहसिलदार इचलकरंजी, प्रांताधिकारी इचलकरंजी, जिल्हा पोलिसप्रमुख, आजी माजी आमदार, खासदार यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT