कोल्हापूर

वंदना पाटील पैठणीच्या मानकरी.

CD

वंदना पाटील पैठणीच्या मानकरी
रांगोळीत ''रंगला खेळ पैठणीचा'' होम मिनिस्टर स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रांगोळी, ता. १० : येथील ग्रामपंचायत व महिला बचत गटातर्फे ''रंगला खेळ पैठणीचा'' ही होम मिनिस्टर स्पर्धा घेतली. यामध्ये वंदना पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या मानकरी ठरल्या.
मौश्मी आवाडे, सरपंच संगीता नरदे, उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी, महिला बालकल्याण सभापती संध्या हवालदार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन केले. स्पर्धेत १४० महिलांनी सहभाग घेतला होता. लकी ड्रॉ पद्धतीने २०० आकर्षक बक्षिसे महिलांना दिली. वंदना पाटील प्रथम क्रमांकासह पैठणीच्‍या मानकरी ठरल्या. द्वितीय अमृता भगत, तृतीय मालुताई शिंगाडी आणि उत्तेजनार्थ रुपाली गायकवाड व सुप्रिया सादळे यांनी मिळविला. विजेत्या स्पर्धकांना सोन्याची नथ, चांदीची जोडवी दिली. ‘जोडी तुझी माझी’ या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्यांनी जोडीदारासोबत केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, किरण कमते, हुमायून मुल्लाणी, सदस्या मंगल कमते, स्वाती कांबळे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करून सरपंच संगीता नरदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संतोष कमते यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : राजकीय स्वीय सहायकाचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT