भूसंपादन भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा
हेरले,ता.१८ : रुकडी-चिंचवाड पंचगंगा नदीवरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील पुलाच्या रस्त्यासाठी आवश्यक असणारी जमीन भूसंपादन करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. जमीन मालकांना मिळणारी भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित केली आहे. ती तत्काळ द्यावी व काम सुरू करावे अन्यथा बुधवारी (ता. २६) लोकशाही मार्गाने लोकआंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करू; असा इशारा रुकडीचे माजी उपसरपंच ॲड. अमितकुमार भोसले यांनी निवेदनाव्दारे दिला.
निवेदनात म्हंटले आहे, ‘रुकडी-चिंचवाड पंचगंगा नदीवरील ग्रामदैवत राजेबागस्वार पुलाच्या या दोन्ही गावाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यासाठी जी जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे त्याची नुकसान भरपाई रक्कम त्या जमीन मालकास मिळणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालकडे वर्ग करण्यात आली आहे. ती आजतागायत जमीन मालकास मिळाली नसल्याने रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळेच जयसिंगपूर-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-इचलकरंजी- माणगाव-रुकडी-चिंचवाड-गांधीनगर-कोल्हापूर-जोतिबा-पन्हाळा या विविध ठिकाणी विविध कामासाठी, दैनंदिन प्रवासी, इतरांना गैरसोयीचे ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.