पिंपळगाव खुर्दला आढळले २८ पक्षी
सिद्धनेर्ली, ता. २५ ः पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथे पक्षी निरीक्षण व गणना उपक्रमांतर्गत अठ्ठावीस प्रकारचे पक्षी आढळले. पिंपळगाव खुर्द विद्यालयाच्यावतीने
जागतिक वन दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव खुर्द गाव तलावाजवळ हा उपक्रम राबविला. आठवी व नववीमधील साठ विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. पक्षी अभ्यासक शिक्षक वैभव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची सुरुवात झाली.
पक्ष्यांमधील जैवविविधता त्यांचे भक्ष्य, त्यांचा जीवनक्रम इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पक्ष्यांच्या खाद्यानुसार त्यांच्या चोचीची रचना बनलेली असते. त्यांची चोच भक्ष्य मिळण्यासाठी पूरक बनलेली असते. हुदहुद पक्षी, धनेश पक्षी, पोपट यांच्या चोचीच्या रचनेवरून उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली.
याबाबत घाटगे म्हणाले, ‘‘प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, प्रदूषण यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे; याची जाणीव करून देण्यासाठी उपक्रम राबविला.’
चौकट
आढळलेले पक्षीवैभव
राखी दिनेश, हुदहूद, कोतवाल, फुलटोचा, धोबी, चंडोल, जांभळा सूर्यपक्षी, लालबुड्या बुलबुल, पाणकावळा, नदी सूरय, वंचक, कोकीळ, जांभळी पाणकोंबडी, होला, दयाळ, कबूतर, वारकरी बदक, तीर, चिमणी, कवड्या खंड्या, पांढऱ्या छातीचा खंड्या, खंड्या, राखी वटवट्या, शिंपी पक्षी, भारतीय चष्मेवाला, मोर, वेडा राघू, तारवाली भिंगरी व बगळा .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.