बामणीत १८ ते २५ एप्रिलअखेर
हरिनाम सप्ताह, पारायण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सिद्धनेर्ली, ता. ४ ः बामणी (ता. कागल) येथे १८ ते २५ एप्रिलअखेर अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सप्ताहाचे हे सलग १२९ वे वर्ष आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता नवनाथ कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण व वीणापूजनाने ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ होईल.
यानिमित्ताने कीर्तन, प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सप्ताहात एकनाथ गुरव, अमोल राबाडे, राणोजी वासकर, अशोक कौलवकर, नवनाथ कुंभार, बाळासाहेब पाटील, विष्णू महाराज, नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम होतील. सप्ताहात पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी अकरा ते दुपारी बारा श्री संत तुकाराम गाथा भजन, दुपारी चार ते पाच हरिपाठ, सायंकाळी सात ते आठ प्रवचन, रात्री साडेनऊ ते साडेअकरा कीर्तन व रात्री बारा ते पहाटे चार संगीत हरी जागर अशा दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता दिंडी सोहळा व माउलींच्या अश्वांच्या रिंगण सोहळ्याचे बामणी फाटा येथे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता, नवनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होईल. पांडुरंग भजनी मंडळाने भाविकांच्या सहकार्याने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.