कोल्हापूर

सांगवडेवाडी ता .25

CD

01503
म्हसोबा यात्रेला
हलसवडेत प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
सांगवडेवाडी, ता. २६ ः हलसवडे (ता. करवीर) येथे म्हसोबा यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. ‘म्हसोबाच्या नावानं चांगभलं..’च्या जयघोषात, बँड पथक, हलगी घुमक्याच्या तालावर ग्रामपंचायत चौकातून म्हसोबाची पालखी निघाली. पोलिसपाटील रामगोंडा पाटील यांच्या घरातून मूर्ती चावडीपासून मरगूबाई मंदिरात यात्रा कमिटीकडून ओटी भरून मारुती मंदिरात नैवेद्य घेऊन बाजार माळावरती मुख्य मंदिरात गेली. तेथील धार्मिक विधी गजानन जमदग्नी यांनी केला. बसगोंडा पाटील (दोडके) यांचा मानाचा घोडा सजवून पालखीमध्ये होता. पालखीचा मान परीट समाजालाही आहे. मारुती मंदिरात यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. माळावर म्हसोबा मंदिरात पुजाऱ्यांचे वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाचला मसोबा मंदिरातून मरगूबाई मंदिर ते मारुती मंदिर येथे परत सायंकाळी सात वाजता पोलिसपाटील यांचे घरी पालखी मिरवणूक आली.
पालखी मार्गावर पायघड्या, रांगोळी, फुलांची सजावट, आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. सरपंच वनिता साळोखे, उपसरपंच मोहन खोचगे, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे यांच्यासह यात्रा कमिटी शिवाजी पाटील, धोंडीराम कागले, बटू टिळे, रमेश मोहिते, राकेश तांबडे, मल्लू पळसे, मनोज पाटील, मंगेश कांबळे, लखन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेनिमित्त पशुप्रदर्शन, रेकॉर्ड डान्स स्पर्धेचेही आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT