कोल्हापूर

मेळावा साेबत फाेटाे(उद्याच्या अंकासाठी आवश्यक).

CD

03239

कौलव: येथे भोगावती कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौलवकर गटाच्या सभासदांच्या मेळाव्यात बोलताना धैर्यशील पाटील कौलवकर. समोर उपस्थित सभासद.
....

‘भोगावती’ निवडणूक
बिनविरोधसाठी तयार

धैर्यशील पाटील ः निवडणूक लागल्यास ताकदीने लढणार

शाहूनगर, ता.१८ः ‘भोगावती साखर कारखाना वाचविण्यासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असेल तर आपण तयार आहोत. मात्र निवडणूक लागल्यास समविचारी मंडळींना सोबत घेऊन आपण ताकदीने कारखान्याची निवडणूक लढवू’, असे प्रतिपादन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी केले.
भोगावती कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौलव (ता.राधानगरी) येथे झालेल्या कौलवकर गटाच्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत पाटील होते. मेळाव्याला करवीर व राधानगरी तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धैर्यशील पाटील म्हणाले, ‘कारखान्याची सत्ता आमच्या ताब्यात असताना आम्ही संस्थापक दादासाहेब पाटील यांच्या विचाराने कारखाना चालविला. उसाची बिले, तोडणी ओढणीची बिले वेळेत दिली. नियमितपणे कामगारांचे पगार व सभासदांना सवलतीची साखर दिली. संचित तोटा कमी केला. कारखान्याचा कारभार काटकसरीने करून कारखाना सुस्थितीत आणला. आज कारखान्याची अवस्था बिकट आहे. अशावेळी कारखाना वाचविण्यासाठी सभासदांनी येत्या निवडणुकीत आम्हाला साथ द्यावी.’
प्रा.डॉ. एन. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विश्वास पाटील, चंद्रहार पाटील, रघुनाथ मिठारी, युवराज पाटील, प्रा. डॉ.डी. एन. पाटील, रणजीत पाटील, किरण पाटील, दिपक पाटील, अमर डोंगळे, शामराव चौगले यांची भाषणे झाली. यावेळी रघुनाथ पाटील, संजय डोंगळे, शिवाजी पारखे, सर्जेराव पाटील उपस्थित होते. प्रा. आर. बी.पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT