कोल्हापूर

गतिराेधक मागणी साेबत फाेटाे

CD

03776
कोल्हापूर- राधानगरी मार्गावर
गतिरोधक बसविण्याची मागणी
शाहूनगर ता. ११ ः कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर-राधानगरी हा कोकण व गोवा राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. अलीकडेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम केले आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे रस्त्यावरून अनेक वाहने सुसाट वेगाने धावत असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या मार्गावरील वाशी, कांडगाव, देवाळे, हळदी, कोथळी, कुरुकली, परिते, घोटवडे, कौलव, सिरसे, आमजाई व्हरवडे, आवळी बुद्रुक, आणाजे, खिंडी व्हरवडे ही गावे रस्त्यावरच आहेत. मात्र या रस्त्यावर गतिरोधक नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. आतापर्यंत या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात झाले असून परिते येथे झालेल्या अपघातात एका महिलेला प्राण गमवावा लागला होता, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन वरील गावांच्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT