कोल्हापूर

लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभागाने कारवाई करावी

CD

लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर
कृषी विभागाने कारवाई करावी

शाहूनगर, ता. १३ ः रासायनिक खतांबरोबर लिंकिंग देणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभागाने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राधानगरी तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी अरुण मगदूम यांना देण्यात आले. जिल्हा उपप्रमुख सुरेश चौगले, तालुकाप्रमुख बाबा पाटील , उपतालुकाप्रमुख उत्तम शेटके, विभागप्रमुख युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन वर्षे रासायनिक खतांबरोबर लिंकिंग दिले जात आहे. २६० रुपयांचा युरिया ५०० रुपयाला विकला जात असून, शेतकऱ्यांची ही लुबाडणूक आहे. तरी लिंकिंग देणाऱ्या कंपन्यांवर अथवा खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करावी. कृषी सेवा केंद्रांनी आपली दुकाने बंद ठेवून लिंकिंगविरोधात आवाज उठवला होता; पण कंपनीच्या लोकांनी त्याला जुमानले नाही. याला रासायनिक खते विक्रेत्यांना जबाबदार न धरता खत विक्री करणाऱ्या कंपनीवर अथवा लिंकिंग करणाऱ्या डीलरवर खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करू. यावेळी भाऊसाहेब रेपे, सागर पाटील, अरुण खामकर, संजय पाटील, अरविंद सनदी, अनिल चौगले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT