4096
कुरुकली : पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या भोगावती महाविद्यालयातील खेळाडूंसोबत प्रशिक्षक.
...........
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी
‘भोगावती’च्या आठजणांची निवड
शाहूनगर, ता. २२ ः कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्कार पाटील, हर्षद भांदिगरे, अथर्व माळी, श्रेया बरगे, विवेक डोंगळे, सलोनी डोंगळे, अद्वैती डोंगळे, सोहम डोंगळे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सातारा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत त्यांनी उज्ज्वल यश मिळवले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे, डॉ. एन. एम.पाटील, प्रा. जयदीप कारंडे, प्रा. डॉ. सुनील खराडे, प्रा. राहुल लहाने, प्रा. सुनीता आवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.