गाडी चालली घुंगराची....
उदं..ग..आई उदं...चा गजर करत हालगी-घुमक्याच्या ठेक्यावर कर्नाटकातील सौंदलगा येथील रंगपंचमी दिवशी होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेला बैलांची आणि गाडीची सजावट करून बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळा घालून कौलव (ता. राधानगरी) येथून निघालेला बैलगाड्यांचा ताफा. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा )
....................
सौंदलग्यातील रेणुका यात्रेसाठी
कौलवमधून बैलगाड्या रवाना
सकाळ वृत्तसेवा
शाहूनगर, ता. १८ ः सौंदलगा (ता. निपाणी) येथे रंगपंचमी दिवशी बुधवारी (ता. १९) होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कौलव (ता. राधानगरी) येथील बैलगाड्या मंगळवारी रवाना झाल्या. ‘उदं गं आई उदं...’चा गजर करीत बैलगाड्यांना निरोप देण्यासाठी गावच्या वेशीवर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
प्रतिवर्षी सौंदलगा येथे होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कौलव येथून भाविक बैलगाड्यांसह रवाना होतात. पूर्वी बैलगाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे सुमारे दीडशे बैलगाड्या यात्रेसाठी जात असत. मात्र, काळाच्या ओघात बैलांची संख्या कमी झाल्यामुळे यात्रेला जाणाऱ्या बैलगाड्यांचीही संख्या कमी झाली. तरीही ग्रामस्थांनी ही परंपरा आजही जोपासली आहे. येथील रेणुका देवीचे मानाचे कोतवाल (घोडा) यांच्यासह आकर्षक सजविलेल्या बैलगाड्यांचा ताफा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंगळवारी सकाळी सौंदग्याकडे रवाना झाला. यावेळी येथील रेणुका मंदिरासमोर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. महिलांनी कोतवालाची मनोभावे पूजा केली. बुधवारी यात्रा झाल्यानंतर गुरुवारी (ता. २०) बैलगाड्या परत येणार आहेत. शुक्रवारी (ता.२१) कौलव येथील रेणुकादेवीची आंबिल यात्रा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.