कोल्हापूर

न्यूनगंड न बाळगता निर्भयपणे पुढे या ः शिंदे

CD

न्यूनगंड न बाळगता निर्भयपणे पुढे या ः शिंदे
शाहूनगर ः ‘महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या सुरक्षेसाठी निर्भयपणे पुढे यावे,’ असे आवाहन करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले. कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात महिला सुरक्षा उपक्रमांतर्गत झालेल्या विद्यार्थिनी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले होते. उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. शिंदे म्हणाले, ‘मुलींनी स्वसंरक्षणासाठी सतर्क असले पाहिजे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. त्यासाठी निर्भया पथके कार्यरत आहेत. जर कोणी मुलींना त्रास देत असेल तर संबंधित विद्यार्थिनींनी न घाबरता पोलिस यंत्रणेकडे तक्रार करावी. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.’ पर्यवेक्षिका एस. एस.आवळे यांनी आभार मानले. प्रा. तेजस्विनी भुईंगडे व प्रा. ऋतिका गोनुगडे यांनी सूत्रसंचालन केले. भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील व सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang: बिश्नोई टोळीला सर्वात मोठा झटका! सरकारकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित, आता पुढची कारवाई काय?

सेल्स गर्ल म्हणून काम करणारी तरुणी आता आहे बॉलिवूडची डान्सिंग क्वीन ! मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Siddhivinayak Trust Donation : श्री सिद्धिविनायक ट्रस्टने अतिवृष्टीच्या संकटातून महाराष्ट्राला सावरण्यासाठी दिले १० कोटी रुपये!

Virar News : संजय भोईरच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित; स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर तरी गावाला रस्ता मिळणार का?

Latest Marathi News Live Update : भांडुप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची बत्ती गुल

SCROLL FOR NEXT