कोल्हापूर

गाय दुध खरेदी दरात कपातीचा निर्णय पशुपालकांचे आयुष्य उध्वस्त करणारा

CD

29393; 29392

ंगाय दूध दर कपात
उत्पन्न द्या मापात

पशुखाद्य, वैद्यकीय सेवेचे दर गगनाला; दुग्ध व्यवसाय धोक्यात

सुरेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा

सोनाळी, ता. १ ः गाय दूध खरेदी दरात तीन रुपये कपातीचा निर्णय पशुपालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे. खासगी, सहकारी दूध संघ, डेअरींचे पशुखाद्य व पशुवैद्यकीय सेवेचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चाचा मेळ बसत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शासनाने ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट ८.५ एसएनएफकरिता किमान प्रतिलिटर २८ रुपये केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रात दूध संघ २७ ते २८ रुपयांनी गाय दूध खरेदी करत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील खासगी, सहकारी संघ व विभागातील डेअरी प्रतिनिधींची बैठक घेऊन ३.५ फॅट ८.५ एसएनएफला ३० रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय गाई पाळणाऱ्या पशुपालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे. कारण बँकांची कर्जे घेऊन बेरोजगार तरुण शेतीबरोबर जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायात पडले आहेत. पाच ते दहा लाख रुपये खर्च करून जनावरांना पोषक गोठे बांधले आहेत. हरियाणावरून जादा दूध देणाऱ्या १० ते २० लाखो रुपये किमतीच्या गायी आणून बेरोजगार तरुण दुग्ध व्यवसाय करीत आहेत. एकीकडे भरमसाट वाढलेले पशुखाद्याचे दर, पशुवैद्यकीय औषधे, डॉक्टरांचा खर्च, सुक्या चाऱ्याचा खर्च यांचा विचार करता दुधाचे उत्पादन व खर्चाचा मेळ घालताना दूध उत्पादकांची तारेवरची कसरत होत आहे. तच महाराष्ट्र शासन दुग्ध व्यवसाय विभागाबरोबर जिल्ह्यातील खासगी, दूध संघ व डेअरींनी गाय दुधाला तीन रुपये कपातीचा निर्णय घेतल्याने दुग्ध व्यवसाय मोडकळीत निघून कर्जात दूध उत्पादक बुडणार असल्याने कुटुंबासह त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरकपातीचा निर्णय मागे घेऊन दूध उत्पादकांना उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

चौकट
संकलनावर परिणाम होणार
गाय दुधाच्या तीन रुपये कपातीमुळे हरियाणासह विविध नामवंत जातीच्या गायींचा दर कमी होणार आहे. यामुळे दूध उत्पादन घटून ग्रामीण भागातील सहकारी दूध संस्थांच्या संकलनावर परिणाम होऊन संस्था अडचणीत येणार आहेत.

चौकट
खर्चाची बाजू वरचढ

वाढलेला पशुखाद्य दर
पशुवैद्यकीय सेवा
सुका चाऱ्याचा खर्च
डॉक्टरांचा खर्च
बॅंकांचे कर्ज
इतर देणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT